Chandrashekar Gokhale

नेहमीच डोक्याने विचार करु नये
कधी भावनानाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना
स्वप्नांचा गाव द्यावा

Charolya

जेव्हा तू माझा
अलगद हात धरलास
खरं सांग तेव्हा तुज्याजवळ
तू कितीसा उरलास .

Charolya

आता मलाही जमायला लागलंय
तुझ्यासारखं वागणं
समोर असलं की गप्प राहणं
रात्री कुढत जागणं

Marathi Poems

इथे प्रत्येक जण आपापल्या घरात
आणि प्रत्येकाचं दार बंद आहे
तरी एकोप्यावर बोलणं हा
प्रत्येकाचा छंद आहे .

Charolya

एकदा मला ना
तू माझी वाट पहाताना पाहायचंय
तेवढयासाठी आडोशाला
हळूच लपून राहाचंय.

Charolya

घराभोवती कुंपण हवं
म्हणजे आपलं जग ठरवता येतं
बाहेर बरबटलेलं असलं तरी
आपल्यापुरतं सावरता येतं

Marathi Poems

मरण दाराशी आल्यावर मी म्हटलं
तुला शंभर वर्षे आयुष्य आहे.
मरण ही चाट पडलं म्हणालं
काय हा मनुष्य आहे ?

Charolya

आठवतं तुला आपलं
एका छत्रीतून जाणं
ओधळणारे थेंब आपण
निथळताना पाहणं

Charolya

माझ्या प्रत्येक क्षणात
तुझा वाटा अर्धा आहे
भुतकाळ आठवायचाय तर
तुझ्याच आठवणीची स्पर्धा आहे

Marathi Poems

आठवणीच्या देशात
मी मनाला कधी पाठवत नाही
जाताना ते खुष असतं
पण येताना त्याला येववत नाही

Charolya

प्रत्येक गावाबाहेर
छोटा महारवाडा आहे
चवथीच्या पुस्तकात मात्र
समानतेचा धडा आहे

Charolya

तुझं हे नेहेमीचं झालंय
आल्या आल्या निघण
मी जाते, मी निघते म्हणताना
मी थांबवतोय का बघण

Marathi Poems

इथे वेडे असण्याचे
खुप फायदे आहेत
शहाण्यांसाठी जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत

Charolya

ठाऊक असतं तुझं येण अशक्य आहे
तरी मन तुझी वाट पाहण सोडत नाही
मी म्हणतो जाऊदे
मी त्यांच मन सोडत नाही

Charolya

तुझ्यावर रागावंण हा
तुला आठवण्याचा बहाणा आहे
तू आलास की तो जातो
तसा माझा राग शहाणा आहे

Marathi Poems

पाण्याचं वागण
किती विसंगत
पोहोणाऱ्याला बुडवून
प्रेताला ठेवतं तरंगत

Charolya

चढाओढ या शब्दाचा अर्थ
आपण किती उलटा लावतो
कोणी वर चढताना दिसला
की लगेच खाली ओढायला धावतो

Charolya

प्रत्येकाला एक आभाळ असावं
कधी वाटत तर भरारण्यासाठी
प्रत्येकाला एक घरट असावं
संध्याकाळी परतण्यासाठी

Marathi Poems

माझ्या हसण्यावर जाऊ नका
माझ्या रूसण्यावर जाऊ नका
जरी तुमच्यात असलो तरी
माझ्या असण्यावर जाऊ नका

Charolya

मी बुडताना माझा
गाव ओझरता पाहिला होता
मला पहायला गाव माझा
काठावर उभा राहिला होता

Charolya

उमलणं आणि फूलणं
यात बरच अंतर आहे
उमलणं अगदी स्वाभाविक आहे
फूलणं त्यन तर आहे

Marathi Poems

सगळीच वादळं मी
खिडकीत बसून पहिली
पण परवाच्या वादळात
माझी खिडकीच वाहिली

Charolya

सगळीच गावं दुरून
सुबक सुंदर दिसतात
गल्लीतून फिरताना कळतं
ती विस्कटलेली असतात

Charolya

जन्मभर जळल्यावर
मेल्यावर पण जाळतात
लाकडापेक्षा माणसंच
लाकडाचे गुणधर्म पाळतात